शाळकरी मुलांच्या खात्यात ९०६ कोटी प्रकरणाशी अभिनेता सोनू सूदचा संबंध?

कतिहार ः बिहारमधील कतिहार जिल्ह्यातील दोन शाळकरी मुलांच्या खात्यात तब्बल ९०६ कोटी आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाशी अभिनेता सोनू सूदचा संबंध असल्याची चर्चा सुरू झाली आहे.आशिष आणि गुरुचरण या मुलांच्या खात्यात ९०६ कोटी आढळले त्याच दिवशी मुंबईत सोनू सूदच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केली होती. विशेष म्हणजे दोन मुले गावातील ग्राहक सेवा केंद्रात …
 
शाळकरी मुलांच्या खात्यात ९०६ कोटी प्रकरणाशी अभिनेता सोनू सूदचा संबंध?

कतिहार ः बिहारमधील कतिहार जिल्ह्यातील दोन शाळकरी मुलांच्या खात्यात तब्बल ९०६ कोटी आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाशी अभिनेता सोनू सूदचा संबंध असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
आशिष आणि गुरुचरण या मुलांच्या खात्यात ९०६ कोटी आढळले त्याच दिवशी मुंबईत सोनू सूदच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केली होती. विशेष म्हणजे दोन मुले गावातील ग्राहक सेवा केंद्रात खात्यातील पैसे तपासण्यासाठी गेले होते, तिथे पैशाच्या व्यवहारासाठी स्पाईस मनी कंपनीच्या यंत्रणेचा वापर होतो. अभिनेता सोनू सूद या कंपनीचा ब्रँड ॲम्बेसिडर आहे. या कंपनीच्या उभारणीत सोनू सूदची मोठी भूमिका आहे. त्यामुळे या व्यवहारांशी सोनू सूदचा काही संबंध आहे का, हे तपासले जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी एका चौकशी समितीचे गठन केले आहे.