विद्यापीठात बसून पाहिला पॉर्न व्हिडिओ; ५ जण निलंबित

मध्य प्रदेशात जीव्हीजी विद्यापीठातील धक्कादायक प्रकारग्वाल्हेर : ग्वाल्हेर येथील जीव्हीजी विद्यापीठातील या कर्मचार्यांनी विद्यापीठातच चक्क पॉर्न साईटस पाहिल्याचा खळबळनजक प्रकार उघडकीस आला आहे. विद्यापीठातील विविध्सा विभागांतील सुमारे ७ ते ८ कर्मचार्यांनी महिनाभरात कार्यालयीन वेळेत तब्बल १२५६ मिनिटे पॉर्न वेबसाईटस पाहिल्या. आठ यूजर आयडी वापरून पॉर्न मूव्ही, व्हिडिओ, पाहिले. धक्कादायक बाब म्हणजे यात दोन महिला कर्मचार्यांचाही …
 

मध्य प्रदेशात जीव्हीजी विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
ग्वाल्हेर :
ग्वाल्हेर येथील जीव्हीजी विद्यापीठातील या कर्मचार्‍यांनी विद्यापीठातच चक्क पॉर्न साईटस पाहिल्याचा खळबळनजक प्रकार उघडकीस आला आहे. विद्यापीठातील विविध्सा विभागांतील सुमारे ७ ते ८ कर्मचार्‍यांनी महिनाभरात कार्यालयीन वेळेत तब्बल १२५६ मिनिटे पॉर्न वेबसाईटस पाहिल्या. आठ यूजर आयडी वापरून पॉर्न मूव्ही, व्हिडिओ, पाहिले. धक्कादायक बाब म्हणजे यात दोन महिला कर्मचार्‍यांचाही समावेश आहे. विद्यापीठ व्यवस्थापनास या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर कुलगुरूंनी एक चौकशी समिती स्थापन केली. समितीने केलेल्या तपासणीत कर्मचार्‍यांच्या अनेक सुरस कथा समोर आल्या. आपला बचाव करताना आम्ही दुसर्‍या साईटस सर्च करत होतो. पण चुकून त्या तशा साईटस ओपन झाल्या, असा दावा त्या कर्मचार्‍यांनी केला. पण समितीने तो अमान्य केला.समितीने कॉम्प्युटरचे आयपीओ अ‍ॅड्रेस तपसले असता त्यावरून पॉर्न साईटृस, युट्यूब, हॉटस्टार आदी प्लॅटफॉर्मवर अनेक अश्लिल व्हिडिओज पाहिले गेल्याचे उघडकीस आले आणि कर्मचार्‍यांचे पितळ उघडले पडले. पाच दोषी कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले असून एका कर्मचार्‍यास नोटीस बजावण्यात आली आहे.