रॉकेल टाकून हेअरस्टाईल करणे महागात; डोके जळाल्याने तरुणाचा मृत्यू
तिरुअनंतपूरम : आजकाल तरुणाईमध्ये चित्रविचित्र प्रकारच्या केशरचना करण्याचे फॅड जोरात आहे. वेगवेगळ्या हेअरस्टाईल करून ते मिरवणे,सोशल मीडियात अपडेट करणे कधीकधी फारच महागात पडू शकते. केरळमधील एका तरुणाला याचा अनुभव आला असून हेअरस्टाईल करताना डोक्याला आग लागून त्यात त्याला जीव गमवावा लागला आहे.
केरळमध्ये तिरुअनंतपूरम जिल्ह्यात वेंगनूर येथे शिवनारायण नावाचा १२ वर्षीय मुलगा हेअरस्टाईल करण्याचा प्रयत्न करत होता. तो सातवीत शिकत होता. सोशल मीडियात व्हिडिओ पाहून त्याने रॉकेल टाकून त्याचे केस सरळ करण्याचा प्रयत्न केला. पण आग भडकल्याने तो गंभीर जखमी झाला त्याचे डोके पूर्णपणे भाजले. त्यात त्याला जीव गमवावा लागला. ही दुर्घटना घडली त्यावेळी तो आणि त्याची आजीच घरी होते. त्यामुळे ही घटना लवकर कुणाच्या लक्षात आली नाही. नंतर शेजार्यांनी मुलाला रुग्णालयात नेले पण तेथे त्याचा मृत्यू झाला. रॉकेल टाकून आग लावून केस हलके गरम केल्यास ते सरळ होतात.मग त्याला हवी तशी स्टाईल देता येते, असे व्हिडिओ सोशल मीडियावर आहेत. ते पाहूनच हा तरुण असे धाडस करत होता. शिवनारायण सोशल मीडियाच्या आहारी गेला होता. असे ग्रामस्थांनी सांगितले.