मंत्री उषा ठाकूर यांची ऑफर… सोबत सेल्फी काढण्यासाठी भरा शंभर रुपये!

भोपाळ ः मध्य प्रदेशातील शिवराज सिंह चाैहान यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये असलेल्या उषा ठाकूर वादग्रस्त विधानांमुळं कायम चर्चेत असतात. आता तर त्यांनी सेल्फीची हाैस भागविणाऱ्यांसाठी एक खुली ऑफरदिली आहे. माझ्यासोबत सेल्फी काढायची, तर शंभर रुपये पडतील, असं त्यांनी म्हटलं आहे. मंत्र्यांना कामं असतात. त्यांना कार्यक्रमाला जायला उशीर होतो, तरी सेल्फीचा मोह काही सुटत नाही. त्यामुळं त्यांनी …
 

भोपाळ ः मध्य प्रदेशातील शिवराज सिंह चाैहान यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये असलेल्या उषा ठाकूर वादग्रस्त विधानांमुळं कायम चर्चेत असतात. आता तर त्यांनी सेल्फीची हाैस भागविणाऱ्यांसाठी एक खुली ऑफरदिली आहे. माझ्यासोबत सेल्फी काढायची, तर शंभर रुपये पडतील, असं त्यांनी म्हटलं आहे. मंत्र्यांना कामं असतात. त्यांना कार्यक्रमाला जायला उशीर होतो, तरी सेल्फीचा मोह काही सुटत नाही. त्यामुळं त्यांनी ही ऑफर दिली असून या माध्यमातून जमा होणारा पैसा त्या पक्षनिधीला देणार आहेत.

खांडवा इथं पत्रकारांशी बोलताना ठाकूर यांनी ही घोषणा केली. या घोषणेचं समर्थन त्यांनी केलं. आपला निर्णय हा पक्षहिताचा असल्याचं त्यांनी नमूद केलं. मंत्र्यांसोबत सेल्फी काढण्यात वेळ जातो. त्यामुळं पुढच्या कार्यक्रमांना उशीर होतो. त्याला आळा घालणं आणि सेल्फी काढणाऱ्यांची इच्छा ही पूर्ण करणं यासाठी शंभर रुपये आकारले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सेल्फीसाठी पैसे घेण्याची मागणी करणारी ठाकूर या पहिल्या मंत्री नाहीत. आता त्यांच्याच खात्याचे कॅबिनेट मंत्री असलेले कुनावर विजय शाह यांनी सहा वर्षांपूर्वी सेल्फी काढणाऱ्यांकडून दहा रुपये घेण्याची मागणी केली होती.