परमबीरसिंग यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

खंडणी वसूल आरोपप्रकरणात उच्च न्यायालयात जाण्याचा सल्लाअनिल देशमुख यांच्यावरील आरोप हे खूपच गंभीरनवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी १०० कोटींच्या खंडणीप्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळून ला वली.ही मागणी घेऊन तुम्ह उच्च न्यायालयात का गेला नाहीत? अशी विचारणा न्यायालयाने केली. …
 

खंडणी वसूल आरोपप्रकरणात उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला
अनिल देशमुख यांच्यावरील आरोप हे खूपच गंभीर
नवी दिल्ली :
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी १०० कोटींच्या खंडणीप्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळून ला वली.ही मागणी घेऊन तुम्ह उच्च न्यायालयात का गेला नाहीत? अशी विचारणा न्यायालयाने केली. तथापि याचिकेत लावण्यात आलेले आरोप गंभीर असल्याचे स्पष्ट मत न्यायालयाने नोंदवले असून यात अनिल देशमुख यांना प्रतिवादी का केले नाही? अशी विचारणाही न्यायालयाने केली.त्यामुळे महाराष्ट्र सरकारची चिंता आणि अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी त्याची बदली करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयास आव्हान देतानाच आपण मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेत केली होती.त्यावर बुधवारी सुनावणी करताना न्यायालयाने ही मागणी घेऊन तुम्ही उच्च न्यायालयात का गेला नाहीत? आधी तुम्ही त्यांच्याकडे जायला हवे होते असे मत व्यकत केले.त्यानंतर परमबीरसिंग यांची त्यांची याचिका मागे घेतली. पण लवकरच ते उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची शक्यता आहे. या सुनावणीवेळी न्यायालयाने अनिल देशमुख यांच्यावर लावण्यात आलेले आरोप हे खूपच गंभीर असून तुम्ही त्यांना प्रतिवादी का केले नाही? असा प्रश्न विचारला. याप्रकरणी सुनावणी करताना न्यायालयाने पोलीस सुधारणांसंदर्भात आम्ही दिलेल्या निर्णयावर सरकारकडून अंमलबजावणी केली गेली नाही हे दुर्दैवी आहे, अशी नाराजीही न्यायालयाने व्यक्त केली.