पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने राष्ट्रपतींकडे मागितली तीन मुलांसह आत्महत्येची परवानगी

अजमेर : राजस्थानातील एका महिलेने देशाच्या राष्ट्रपतींना पाठविलेल्या पत्रात तीन मुलांसह आत्महत्या करण्याची परवानगी मागितलीआहे. पतीच्या रोजच्या त्रासाला आपण कंटाळलो असून पती व सासरच्या मंडळींकडून दररोजच त्रास होत असल्याने आम्हाला आता आत्महत्येशिवाय पर्याय उरला नसल्याचे महिलेने म्हटले आहे.अजमेरमधील पटेल नगर भगातील तोपदडा येथील सोनू चौहान नावाची एक महिला निवेदन घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचली. तिने थेट …
 

अजमेर : राजस्थानातील एका महिलेने देशाच्या राष्ट्रपतींना पाठविलेल्या पत्रात तीन मुलांसह आत्महत्या करण्याची परवानगी मागितलीआहे. पतीच्या रोजच्या त्रासाला आपण कंटाळलो असून पती व सासरच्या मंडळींकडून दररोजच त्रास होत असल्याने आम्हाला आता आत्महत्येशिवाय पर्याय उरला नसल्याचे महिलेने म्हटले आहे.
अजमेरमधील पटेल नगर भगातील तोपदडा येथील सोनू चौहान नावाची एक महिला निवेदन घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचली. तिने थेट देशाच्या राष्ट्रंपतींच्याच नावाने निवेदन लिहिले असून त्यात तिने तिची कर्मकहानी मांडली आहे. कलेक्टरना दिलेल्या निवेदनात तिने म्हटले आहे की, पीडितेचे सासरची मंडळी मला माझ्या मुलांसहीत घराबाहेर काढण्याची धमकी देत आहेत.माझा विवाह २००७ मध्ये झाला. त्यानंतर काही दिवसांनी माझे पती, सासू व नणंद मला नेहमी मारहाण करून हुंड्याची मागणी करतात. अनेक वर्षांपासून मी त्यांचा हा अत्याचार सहन करत आहे. मला तीन मुले आहेत. पण गेल्या चार वर्षांपासून सासरची मंडळी मला मुलांना भेटू देत नाहीत. मी हे घर सोडून निघून जावे म्हणून मला पती दररोज मारहाण करतो. मी १४ वर्षांपासून अन्याय सहन करत असून आता मी नोकरीवर जाऊ, मुलांना सांभाळू की त्यांचा त्रास सहन करू असे मला झाले आहे. त्यातून सुटका व्हावी म्हणून मला माझ्या मुलांसह आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी, अशी याचना तिने पत्रात केली आहे. यावर काय निर्णय घ्यावा असा पेच प्रशासनाला पडला आहे.