नात्याला काळिमा… बापच करीत होता मुलीवर सहा महिने बलात्कार!

चेन्नई ः बाप मुलीचं नातं पवित्र असतं; परंतु या नात्याला काळिमा फासणारी घटना तामिळनाडूतील नेल्लूरमध्ये घडली. अल्पवयीन १४ वर्षांच्या मुलीवर तिचा बापच सलग सहा महिने बलात्कार करीत होता. तिच्या दहा वर्षांच्या भावाच्या एक दिवस हा प्रकार लक्षात येताच त्यानं आरडाओरड केली. त्यानंतर हा बाप फरार झाला. पीडितेच्या छोट्या भावानं एक दिवस बापाचं विकृत कृत्य पाहिलं. …
 

चेन्नई ः बाप मुलीचं नातं पवित्र असतं; परंतु या नात्याला काळिमा फासणारी घटना तामिळनाडूतील नेल्लूरमध्ये घडली. अल्पवयीन १४ वर्षांच्या मुलीवर तिचा बापच सलग सहा महिने बलात्कार करीत होता. तिच्या दहा वर्षांच्या भावाच्या एक दिवस हा प्रकार लक्षात येताच त्यानं आरडाओरड केली. त्यानंतर हा बाप फरार झाला.

पीडितेच्या छोट्या भावानं एक दिवस बापाचं विकृत कृत्य पाहिलं. सावत्र बाप बहिणीसोबत करीत असलेलं चुकीचं कृत्य पाहून तो जोरानं ओरडला. मुलाचा आवाज ऐकताच शेजाऱ्यांनी धाव घेतली. तोपर्यंत आरोपी फरार झाला. पहिल्या बायकोला त्यानं घटस्फोट दिला. त्यानंतर त्यानं दोन मुलांची आई असलेल्या एका महिलेसोबत लग्न केलं. नव्या पत्नीच्या मुलीसोबतच त्यानं किळसवाणा प्रकार केला.

पीडितेची आई पतीविरोधात तक्रार करण्यास घाबरत होती. मुलीच्या बोलण्यावर तिचा विश्वास नव्हता. एका स्थानिक महिला संघटनेनं पोलिसांत फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिस अधीक्षक राजगोपाल रेड्डी यांनी पीडितेची चाैकशी केली. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. लवकरच तो पोलिसांच्या ताब्यात असेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.