चुलत भावाशी विवाह करणार्‍या युवतीचा पुतळा बनवून कुटुंबियांनी केले अंत्यसंस्कार

रांची : आपल्या समाजात काही विवाह निषिद्ध मानण्यात आले आहेत. त्या घटकाशी/ व्यक्तीशी विवाह केला तर समाज इतकेच कशाला स्वत:चे कुटुंबही अशी गोष्ट मान्य करत नाही. कारण त्याबाबतीत त्यांच्या धारणा पक्क्या णालेल्या असतात. झारखंडमध्ये एका युवतीने घरच्यांचा विरोध डावलून तिच्या चुलत भावाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.त्यांचा हा विवाह दोन्हीकडील कुटुंबांना मान्य होत नव्हता.तरीही हे प्रेमी …
 

रांची : आपल्या समाजात काही विवाह निषिद्ध मानण्यात आले आहेत. त्या घटकाशी/ व्यक्तीशी विवाह केला तर समाज इतकेच कशाला स्वत:चे कुटुंबही अशी गोष्ट मान्य करत नाही. कारण त्याबाबतीत त्यांच्या धारणा पक्क्या णालेल्या असतात. झारखंडमध्ये एका युवतीने घरच्यांचा विरोध डावलून तिच्या चुलत भावाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.त्यांचा हा विवाह दोन्हीकडील कुटुंबांना मान्य होत नव्हता.तरीही हे प्रेमी जोडपे मागे हटले नाही. मग मुलीकडच्या लोकांना चक्क तिचा पुतळा बनवून आणला. त्याची गावातून शवयात्रा काढली. स्मशानभूमीत तो पुतळा नेऊन त्यावर रितसर अंत्यसंस्कार करविले.
झारखंडमध्ये चतरा जिल्ह्यात टंडवा भागातील खरिका गावात एका कुटुंबातील युवतीने तिचे प्रेम जडलेल्या चुलत भावासोबत विवाह करण्याचा निर्णय घेतला. त्याला कुटुंबियांनी विरोध केला. पण तो विरोध डावलून ते दोघे विवाहबद्ध झाले. यामुळे मुलीच्या कुटुंबियांचा रागाचा पारा प्रचंड वाढला. रागाच्या भरात त्यांनी पोटच्या मुलीचा एक कृत्रिम पुतळा बनवून घेतला. या पुतळ्याची त्यांनी अंत्ययात्रादेखील काढली. अंत्ययात्रा स्मशानभूमीत नेऊन त्याठिकाण पुतळ्यावर रितसर अंत्यसंस्कार करवून घेतले.एवढेच नव्हे तर मुलीचा पिता व इतर कुटुंबियांनी तिच्यासोबत आयुष्यभरासाठी सर्व संबंध तोडून टाकण्याची भूमिका जाहीर केली.मुलीच्याया विवाहामुळे समाजात व गावात आपली प्रतिष्ठा धुळीला मिळाली आहे. त्यामुळे यापुढे आम्ही तिच्याशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवू इच्छित नाही, असे तिच्या वडिलांनी जाहीर केले आहे.या कथित अंत्यसंस्काराला अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.