आठवी पास कंपाउंडरने केले सिझेरियन महिलेसह, बाळ दगावले
उत्तर प्रदेशातील धक्कादायक प्रकार; दोन जण अटकेत
सहारणपूर : उत्तर प्रदेशात सहानणपूर जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेचा भयावह चेहरा समोर आला आहे. येथे एका खासगी रुग्णालयात चक्क आठी पास कंपाऊडरने गभर्वतीचे सिझेरियन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने सिझेरियन करण्यासाठी चक्क ब्लेडचा वापर केला. यात त्या महिलेसह बाळाचाही मृत्यू झाला. ही बाब उजेडात आल्यानंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीसह रुग्णालयाच्या मालकालाही अटक केली आहे.
सहारनपूर जिल्ह्यात सैनी गावातील एका खासगी रुग्णालयात पुनम नावाची गर्भवती बाळंतपणासाठी दाखल झाली होती. रुग्णालयातील कर्मचारी राजेंद्र शुक्ला याने रुग्णालयात शस्त्रकियेच्या कोणत्याही सुविधा उपलब्ध नसतानाही पुनमचे सिझेरियन करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी लागणारी साधने नसल्याने त्याने चक्क साध्या ब्लेडने महिलेची शस्त्रक्रिया केली. पण त्यानंतर चा वापर केला. पण ऑपरेशननंतर पूनमाचा रक्तप्रवाह थांबला नाही व तिची प्रकृती गंभीर बनली.त्यानंतर घाबरलेल्या शुक्लाने तिला दुसर्या रुग्णालयात हलविण्यास सांगितले. पण जवळपास कोणतेही मोठे रुग्णालय नसल्याने तिला १४० किलोमीटरचा प्रवास करून लखनौ येथील रुग्णालयात न्यावे लागले. तिथे उपचार सुरू असताना अतिरक्तस्त्रावामुळे तिचा मृत्यू झाला. त्यानंतर काही वेळातच बाळही दगावले. याप्रकरणी तिच्या पतीने पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी संबंधित कर्मचारी व रुग्णालय मालक राजेश साहानी यालाही अटक करून त्यांच्याविरोधत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस तपासात त्या रुग्णालयात एकही डॉक्टर नव्हता. तेथे आया, कंपाउंडर, दोन नर्स, वॉर्डबॉय हेच बहुतांशवेळा सर्वप्रकारचे रुग्ण हाताळत असत, असे आढळून आले.