अबब… दोन शाळकरी मुलांच्या खात्यात जमा झाले ९०६ कोटी!

पटना : बिहारमधील एका व्यक्तीच्या खात्यात साडेपाच लाख आढळल्याच्या बातमीची चर्चा सुरू असतानाच बिहारमध्येच आणखी एक प्रकार समोर आला आहे. दोन शाळकरी मुलांच्या खात्यात तब्बल ९०६ कोटी आढळल्याने मुलांसह, त्यांचे पालक, शाळा आणि प्रशासन सर्वच हैराण आहेत. एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे.एनडी टीव्हीच्या वृत्तानुसार बिहार राज्यातील कतिहार जिल्ह्यातील एका गावात ६ व्या वर्गातील आशिषच्या खात्यात …
 
अबब… दोन शाळकरी मुलांच्या खात्यात जमा झाले ९०६ कोटी!

पटना : बिहारमधील एका व्यक्तीच्या खात्यात साडेपाच लाख आढळल्याच्या बातमीची चर्चा सुरू असतानाच बिहारमध्येच आणखी एक प्रकार समोर आला आहे. दोन शाळकरी मुलांच्या खात्यात तब्बल ९०६ कोटी आढळल्याने मुलांसह, त्यांचे पालक, शाळा आणि प्रशासन सर्वच हैराण आहेत. एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे.
एनडी टीव्हीच्या वृत्तानुसार बिहार राज्यातील कतिहार जिल्ह्यातील एका गावात ६ व्या वर्गातील आशिषच्या खात्यात ६.२ कोटी तर गुरुचरण नावाच्या मुलाच्या खात्यात ९०० कोटी रुपये मिळून आले. शाळेच्या गणवेश आणि इतर खर्चासाठी मुलांच्या खात्यात पैसे जमा होणार होते म्हणून मुले खात्यात पैसे आले का हे पाहण्यासाठी गावातीलच एका इंटरनेट केंद्रात गेले होते.तिथे खात्याची तपासणी केली असता त्यांना धक्काच बसला. कतिहार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी उदयन मिश्रा यांनी सांगितले की या प्रकरणाची माहिती मिळाली असून आम्ही त्याची चौकशी करीत आहोत.