प्रशांत किशोर राहुल गांधींच्या भेटीला

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये भाजपचं आव्हान मोडीत काढण्यात ममता बॅनर्जी यांना मोठी मदत करणाऱ्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या एकाच महिन्यांत तीनदा भेट घेतलेल्या रणनीतीकार प्रशांत किशोर आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भेटीला पोहोचले आहेत. त्यांच्यात चर्चा सुरू आहे. नवी दिल्लीतल्या राहुल यांच्या निवासस्थानी ही भेट सुरू आहे. या बैठकीला …
 

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये भाजपचं आव्हान मोडीत काढण्यात ममता बॅनर्जी यांना मोठी मदत करणाऱ्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या एकाच महिन्यांत तीनदा भेट घेतलेल्या रणनीतीकार प्रशांत किशोर आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भेटीला पोहोचले आहेत. त्यांच्यात चर्चा सुरू आहे.

नवी दिल्लीतल्या राहुल यांच्या निवासस्थानी ही भेट सुरू आहे. या बैठकीला काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी आणि वरिष्ठ नेते वेणुगोपालदेखील उपस्थित आहेत. पुढील वर्षी उत्तर प्रदेशासह पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राहुल आणि किशोर यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचं सरकार कायम ठेवण्यात प्रशांत किशोर यांची भूमिका महत्त्वाची होती. त्यानंतर देशातील भाजपविरोधकांची पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीतही त्यांचा वाटा होता. पुढील वर्षी उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राहुल आणि किशोर यांची भेट होत असल्यानं तिला अधिक महत्व आहे. पंजाबमध्ये सध्या काँग्रेसमधील अंतर्गत कलह वाढला आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्ध यांच्यात शह-काटशहाचं राजकारण सुरू आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. पंजाबमध्ये २०१७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत किशोर यांनी काँग्रेसचे रणनीतीकार म्हणून काम केलं होतं. उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि राहुल गांधींना एकत्र आणलं; मात्र सप-काँग्रेस युतीला मतदारांनी नाकारलं. या पार्श्वभूमीवर किशोर आणि राहुल गांधी यांच्या चर्चेतून काय निष्पन्न होणार, याकडं लक्ष लागलं आहे.