दोन दुचाकींची समोरासमोर धडक; १ ठार, १ गंभीर जखमी

देऊळगाव राजा तालुक्‍यातील घटना
 
 
File Photo

देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)  ः दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यात एक दुचाकीस्वार ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना काल, ११ नोव्हेंबरला रात्री ९ च्या सुमारास देऊळगाव राजा - सिंदखेड राजा रोडवरील नमन कॉटनसमोर (ता. देऊळगाव राजा) घडली.

गणेश दामोदर गायकवाड (३०, रा. खल्याळ गव्हाण, ता. देऊळगाव राजा) असे ठार झालेल्या व्यक्‍तीचे नाव आहे. भगवानराव आढाव (४०, रा. देऊळगाव राजा) गंभीर जखमी झाले. अपघाताची  माहिती मिळताच माळीपुरा व त्र्यंबकनगर येथील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. युवकांच्या मदतीने शासकीय रुग्‍णवाहिकेतून मृतकाला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, तर अपघातातील गंभीर जखमी भगवानराव आढाव यांना नातेवाइकांनी जालना येथे हलविले. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास देऊळगाव राजा पोलीस ठाण्याचे पोहेकाँ प्रदीप कुमार गुंजकर करत आहेत.