दारू पिऊन घरात घुसत वाईट उद्देशाने केले हे कृत्‍य!

नांदुरा तालुक्यातील घटना
 
rape
नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जुन्या वादावरून ४० वर्षीय महिलेचा विनयभंग करण्यात आल्याची घटना १३ नोव्हेंबर रोजी पोटळी (ता. नांदुरा) येथे सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. महिलेने काल, १४ नोव्हेंबर रोजी नांदुरा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून किसना मधुकर खैरे (४२, रा. पोटळी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
१३ नोव्हेंबर रोजी सकाळी महिला तिच्या मुलीसह घरी होती. त्या वेळी किसना दारू पिऊन तिच्या घरात घुसला. जुन्या वादावरून त्याने महिलेसोबत भांडण केले. अश्लील शिवीगाळ केली. महिलेने त्‍याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्‍याने तिचा वाईट उद्देशाने हात पकडून विनयभंग केला, असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.