तरुणीचा मोबाइल गेला चोरीला!; शेगाव येथील घटना

 
mobile thief
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगावच्या आठवडे बाजारात आलेल्या १८ वर्षीय तरुणीचा मोबाइल कुणीतरी चोरल्याची घटना काल, १६ नोव्‍हेंबरला दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.
कु. वैशाली गोपाल वावरे (१८, रा. लोहारा, ता. बाळापूर जि. अकोला) या तरुणीने या प्रकरणात तक्रार दिली. तिचा विवो कंपनीचा ५ हजार रुपयांचा मोबाइल चोरट्याने बॅगमधून लांबवला. तपास पोहेकाँ मुरलीधर वानखडे करत आहेत.