आगीत घर जळून खाक झाल्याने शेतकरी कुटुंब उघड्यावर; किन्ही नाईक येथील घटना

 
आग
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः घराला आग लागून संसारोपयोगी साहित्यासह ७ लाख रुपयांचे नुकसान झाले. यामुळे शेतकरी कुटुंब उघड्यावर आले आहे. ही घटना किन्ही नाईक (ता. चिखली) येथे काल, ३ जानेवारीला सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.
रामेश्वर चिंचोले हे पत्‍नीसह शेतात कामाला गेले होते. सायंकाळी अचानक आग लागून घरातील सोयाबीनचे १८ पोते, नगदी पैसे, सोने-चांदीचे दागिने, धान्य, टीव्‍ही, फ्रीज, कुलर, गॅस सर्वच जळून खाक झाले. अंगावरील कपड्याशिवाय आता या कुटुंबाकडे काहीच नसल्याचे दुर्दैवी चित्र निर्माण झाले आहे. तलाठी व्‍ही. के. मोरे, पोलीस पाटील संगिता वानखेडे यांनी घटनेचा पंचनामा केला. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. आग विझविण्यासाठी गावकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्‍न केले. मात्र घर वाचवू शकले नाहीत.