सव्वा लाखाचे स्वप्न चोरट्यांनी नेले चोरून!; शेतकरी हवालदील

मेहकर तालुक्‍यात घडली ही घटना
 
जानेफळ पोलीस ठाणे
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पाथर्डी (ता. मेहकर) येथे शेतातील कोठ्यातून चोरट्यांनी सव्वा लाख रुपयांचे २५ पोते सोयाबीन चोरून नेले. ही घटना ३१ ऑक्‍टोबरला समोर आली. ५२ वर्षीय शेतकऱ्याने जानेफळ पोलीस ठाण्यात १ नोव्‍हेंबरला तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. 
तारासिंग चतरू चव्हाण यांनी या प्रकरणात तक्रार दिली. त्‍यांनी २५ पोते साेयाबीन शेतात असलेल्या कोठ्यात थप्पी मारून ठेवली होती. वडील चतरू चव्हाण यांना दम्याचा त्रास वाढल्याने ते वडिलांना घेऊन वरवंडला गेले होते. ३० ऑक्‍टोबरच्या सायंकाळी ७ ते ३१ ऑक्‍टोबरच्या सकाळी ८ पर्यंत कुणीच कोठ्यावर नव्‍हते. हीच संधी साधून चोरट्यांनी सोयाबीनचे पोते चोरून नेले. नातू रितेश राम राठोड शेतातील कोठ्यावर आला असता त्‍याला चोरी झाल्याचे लक्षात आले. तपास पोहेकाँ श्री, टकले करत आहेत.