गोठ्याला आग लागून म्‍हैस, वगारू मृत्‍यूमुखी

शेतकऱ्याचे पावणेतीन लाखांचे नुकसान, मेहकर तालुक्‍यातील घटना
 
file photo
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शॉर्टसर्किटमुळे गोठ्याला आग लागून म्‍हैस व वगारू होरपळून मृत्‍यूमुखी पडले. आगीत शेतकऱ्याचे शेतीउपयोगी साहित्य जळून खाक झाले. एकूण २ लाख ७ हजार ३०० रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना मेहकर तालुक्यातील पिंपळगाव उंडा शिवारात काल, १६ नोव्हेंबरला रात्री साडेअकराच्या सुमारास घडली.
अंबादास आश्रू महाकाळ यांच्या घराला लागूनच गोठा होता. काल अचानक गोठ्याला आग लागली. काही कळण्याच्‍या आतच आगीने रौद्ररुप धारण केले आणि अवघा गोठा आणि त्‍यातील साहित्य खाक झाले. तलाठी श्री. खरात यांनी घटनेचा पंचनामा केला. म्‍हैस, वगारूसोबतच स्प्रिंकलर पाइप, ठिबक संच, शेती अवजारे, धान्य जळून गेले. अंबादास महाकाळ यांना सरकारने मदत करावी, अशी मागणी गावातून होत आहे.