रात्री झोपेत चावला साप!; तरुणीचा मृत्यू

शेगाव शहरातील घटना
 
file photo
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः रात्री झोपेत असताना साप चावल्याने तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना आज, २० नोव्हेंबर रोजी पहाटे तीनला घडली.

आमिनाबी शेख अनिस (१८, रा. टिपू सुलतान चौक, शेगाव) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. तिला आज, 20 नोव्हेंबरला पहाटे पावणे तीनच्या सुमारास विषारी सापाने चावा घेतला. तातडीने तिला शेगाव येथील सईबाई मोटे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र सकाळी ६ च्या सुमारास तिचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. शेगाव शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.