स्वस्त धान्य दुकानदाराला मागितली १६ हजाराची लाच; नांदुऱ्याच्या पुरवठा निरीक्षण अधिकारी पुनम थोरात यांना रंगेहाथ अटक, एसीबीची कारवाई !
तक्रारदाराच्या चुलत्यांच्या नावावर स्वस्त धान्य दुकान आहे. ही दुकान प्रत्यक्षात तक्रारदारच चालवतात. या दुकानाची २९ ऑक्टोबर २०२५ रोजी तपासणी झाली होती. तपासणी अहवालात कोणतीही त्रुटी आढळून न आल्याने तो जिल्हा पुरवठा अधिकारी, बुलढाणा यांचेकडे पाठवणे अपेक्षित होते. तसेच दुकानाचा धान्य पुरवठा सुरळीत सुरू राहण्यासाठीही कोणताही अडसर नव्हता.
तथापि, पुरवठा निरीक्षण अधिकारी पुनम थोरात यांनी हा अहवाल तक्रारदारांच्या बाजूने पाठवण्यासाठी आणि धान्य पुरवठा नियमित ठेवण्यासाठी १६,००० रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती. तक्रारीची खातरजमा करण्यासाठी एसीबीने पडताळणी केली. पडताळणी दरम्यान आरोपी अधिकाऱ्यांनी तक्रारदारांकडून लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले.
त्यानुसार नांदुरा तहसिल कार्यालयातील दालनातच
तक्रारदाराकडून १६,००० रुपये स्वीकारताना पुरवठा निरीक्षण अधिकारी पुनम थोरात रंगेहात पकडल्या गेल्या. या प्रकरणात आरोपी अधिकाऱ्यांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास अॅन्टी करप्शन ब्युरो करीत आहे.ही कारवाई
बापू बांगर, पोलिस अधीक्षक, एसीबी, अमरावती, सचिंद्र शिंदे, अपर पोलिस अधीक्षक, एसीबी, अमरावती,भागोजी चोरमले, पोलिस उपअधीक्षक, एसीबी, बुलढाणा यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. या कारवाईत पीआय रमेश पवार, पोहेकॉ प्रविण बैरागी, अमोल झिने, पोना जगदीश पवार, पोकॉ रंजीत व्यवहारे, मपोकॉ स्वाती वाणी, चापोहेका नितीन शेटे आणि एसीबी बुलढाणा पथकाने सहभाग घेतला.
