साखरखेर्ड्यात बचतगटाच्या महिलांचे पैसे हडपले!

संस्‍थाध्यक्षाविरुद्ध गुन्‍हा दाखल
 
पैसे

सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बचतगटातील महिलांनी वर्गणी केलेले १ लाख ९७ हजार रुपये परस्पर स्वतःच्‍या खात्यात वळवून अपहार करण्यात प्रकार साखरखेर्ड्यात समोर आला आहे. या प्रकरणी CMRC संस्थेच्या सध्याच्या अध्यक्षा आशाबाई सरकटे (रा. साखरखेर्डा, ता. सिंदखेड राजा) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी संस्‍थेच्या तत्‍कालिन अध्यक्षा सुनिता रामेश्वर खरात (रा. शिंदी, ता. सिंदखेड राजा) यांच्याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

आशाबाई सरकटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सुनिता खरात २५ डिसेंबर २०२० पर्यंत CMRC संस्थेच्‍या अध्यक्षा होत्या. वार्षिक सभेत निवडणूक होऊन १३ फेब्रुवारी २०२१ रोजी कमल जाधव या अध्यक्षा झाल्या. मात्र २०१७ पासून कार्यालयाचे ऑडिट करण्यात आले नव्‍हते. बचत गटाच्या ३३६५ महिला दरवर्षी कार्यालयीन कामासाठी १०० रुपये वर्गणी करून भरत होत्या. या वर्गणीचे १ लाख ९७ हजार ६३० रुपये सुनिता खरात यांनी स्वतःच्या एसबीआय खात्यात टाकून या रकमेचा अपहार केल्याचे तक्रारीत म्‍हटले आहे. तपास पोलीस उपनिरिक्षक सचिन कानडे करत आहेत.