रेतीतस्करीविरोधात SDO उतरले रस्त्यावर!; दोन टिप्पर पकडले!!

बुलडाणा शहरात कारवाई
 
रेती टिप्पर
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः रेती तस्‍करीविरोधात आता बुलडाण्याचे उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे रस्‍त्‍यावर उतरले आहेत. त्‍यांनी ३१ ऑक्‍टोबरला रात्री अवैध रेती वाहतूक करणारे दोन टिप्पर पकडले. त्‍यांच्‍या कारवाई रेतीमाफियांत खळबळ उडाली आहे.
बुलडाणा शहरात मोठ्या प्रमाणात रेती तस्करी सुरू आहे. देऊळगाव मही, जाफराबाद येथून रात्रीच्या वेळी रेती बुलडाणा शहरात आणले जाते. ३१ ऑक्टोबरला रात्री उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे चिखली रोडवर गस्तीवर असताना त्यांना चिखलीकडून बुलडाण्याकडे येत असलेले दोन टिप्पर दिसले. त्यांना थांबवून विचारपूस केली असता त्या दोन्ही टिप्पर चालकांकडे रेती वाहतुकीची रॉयल्टी आढळली नाही. दोन्ही टिप्पर जप्त करुन शहर पोलीस ठाण्यात लावण्यात आले आहेत.