गर्भवती बायकोवर नवऱ्याने बलात्कार केला! घटस्फोट न देताच केले बायकोच्या भावजयीसोबत लगीन! अंत्री कोळीचा आहे कारनामे करणारा नवरा; साखरखेर्डा पोलीस ठाण्यात दाखल तक्रार पाहून पोलीसही चक्रावले

 
crime
मलकापूर पांग्रा( अमोल साळवे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आधी बायकोचा पैशांसाठी अतोनात छळ केला. गर्भवती बायकोवर तिची इच्छा नसतांना जबरदस्ती बलात्कार केला. त्यानंतर बायकोशी घटस्फोट झालेला नसतांना बायकोच्या भावाच्या बायकोशी लगीन केले, त्याचे फोटो बायकोला पाठवले. विशेष म्हणजे जिच्यासोबत दुसरे लगीन केले तिचाही आधीच्या नवऱ्याशी घटस्फोट झालेला नाही. पिडीत विवाहितेने साखरखेर्डा पोलीस ठाण्यात तशी तक्रार दिलीय. तक्रार पाहून पोलिसही न चक्रावले तर नवलच..
 

 मलकापूर पांग्रा येथील एका विवाहितेने(३०) याप्रकरणाची तक्रार दिली आहे.२०१८ मध्ये अंत्री कोळी येथील एका तरुणाशी तिचे मुस्लिम रितीरीवाजा प्रमाणे लग्न झाले होते. तक्रारीनंतर सुरुवातीचे केवळ दोन महिने तिला चांगले वागवले. त्यानंतर  गाडी घेण्यासाठी माहेरवरून २ लाख रुपये आणण्यासाठी तिच्या सासरच्यांनी तगादा लावला. माझ्या वडिलांनी लग्नात ५ लाख दिलेत आता पुन्हा २ लाख ते कुठून देतील असे विवाहिता त्यांना सांगत होती.मात्र तिचे काहीही एकूण घेण्यात येत नव्हते. सासराही दारू पिऊन अश्लील शिवीगाळ करायचा, घरातील इतर लोक शारीरिक व मानसिक छळ करायचे असे तिने तक्रारीत म्हटले आहे. विवाहिता गरोदर असताना तिच्या नवऱ्याने तिच्याशी जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले, याप्रकरणात साखरखेर्डा पोलीस ठाण्यात याआधीच बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय. 


दरम्यान विवाहिता गरोदर असताना व माहेरी असताना नवऱ्याने तिला धमकीचे मॅसेज पाठवले.पैसे दिले नाही तर दुसरे लगीन करील असे त्या  मेसेज मध्ये होते. काही दिवसांत त्याने त्याच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो विवाहितेला पाठवले. फोटो पाहून विवाहितेला धक्का बसला, कारण तिच्या भावाच्या बायकोसोबत तिच्या नवऱ्याने दुसरा संसरा थाटला होता. तक्रारदार विवाहीतेसोबत घटस्फोट घेतला नव्हताच शिवाय जीच्यासोबत दुसरे लगीन केले तिनेही आधीच्या नवऱ्यासोबत घटस्फोट घेतलेला नाही. नवऱ्याने केलेले लग्न बेकायदेशीर असल्याचे तक्रारदार विवाहितेचे म्हणणे आहे. पोलिसांनी याप्रकरणी विवाहितेच्या सासरकडील  पतीसह, दिर, सासू, सासरा यांच्यासह ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.