निरीक्षणगृहातून पळालेल्या दोघांपैकी एक जण सापडला

खामगाव पोलिसांनी शोधले : एक जण अद्याप फरार
 
 
हे तुमच्यासोबतही घडू शकते…! पोलीस असल्याचे सांगून मोटारसायकल अडवली अन्‌ वृद्धाचे दीड लाखाचे दागिने घेऊन दोन भामटे झाले पसार!; खामगाव शहरातील धक्‍कादायक घटना
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाण्यातील शासकीय मुलांच्‍या निरीक्षणगृहातून तीन विधिसंघर्ष मुले १३ नोव्हेंबर रोजी पळून गेली होती. यातील एका मुलाला शोधण्यात त्याच दिवशी यश आले होते तर दोघे जण फरारी होते. त्यातील आणखी एकाला शोधण्यात खामगाव शहर पोलिसांना यश आले आहे. काल, २१ नोव्हेंबर रोजी त्‍याला ताब्यात घेऊन निरीक्षणगृहात आणण्यात आले.

वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी घरफोडीसारखे गुन्हे करणाऱ्या तिघांना निरीक्षणगृहात ठेवण्यात आले होते. सध्या ते तरुण असले तरी गुन्हे बालवयात केलेली असल्याने त्यांना निरीक्षणगृहात ठेवण्यात आलेले होते. मात्र १३ नोव्हेंबरच्या संध्याकाळी २३ वर्षे, २५ वर्षे व १९ वर्षे वयाची ही तरुण मुले निरीक्षणगृहाच्या किचनचा दरवाजा तोडून फरार झाली होती. त्यातील १९ वर्षे वयाच्या मुलाला त्याच दिवशी येळगाव धरणाच्या दिशेने जाताना पकडण्यात आले होते. मात्र २ मुले पळून जाण्यास यशस्वी झाली होती. याप्रकरणी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद घेऊन शोध घेणे सुरू होते. दरम्यान खामगाव शहर पोलिसांनी २३ वर्षे वयाच्या विधीसंघर्ष ग्रस्त तरुण मुलाला पकडून काल, २१ नोव्हेंबर रोजी निरीक्षणगृहाच्या ताब्यात दिले आहे. अजूनही एक जण फरारी असून, त्याचा शोध घेणे सुरू आहे, अशी माहिती शासकीय मुलांचे निरीक्षणगृह, बालगृहाचे अधीक्षक महेंद्र अष्टेकर यांनी दिली आहे.