पोटात दुखू लागलं; डॉक्टरांनी तपासल्यावर धक्काच बसला! अल्पवयीन मुलगी निघाली गर्भवती... पाप कुणाचं? जामनेरच्या प्रशांत चव्हाणच ! बुलढाण्यात गुन्हा दाखल

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): हल्ली अल्पवयीन मुली प्रेमात पडतात..या अल्लड वयात आपल्या शरीराचा कुणी फायदा घेतय हे त्यांना कळतच नाही.. "प्यार मे सब कुछ " अशाच तोऱ्यात मुली वागतात..नंतर त्याचे भयंकर परिणाम समोर येतात, मात्र तोपर्यंत बरच काही झालेलं असतं..वेळ निघून गेलेली असते..क्षणिक सुखासाठी प्रियकराच्या हवाली केलेल्या शरीराचे हाल झालेले असतात.. बुलढाणा येथील स्त्री रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुली सोबतही नको ते घडलं..प्रेमप्रकरणातून सेक्स अन् त्यातून प्रेग्नेंट असं हे प्रकरण आहे..डॉक्टरांनी मुलीला तपासल्यानंतर ती ८ महिन्यांची गर्भवती असल्यास समोर आलंय..प्रकरण पोलिसांत गेल्यानंतर मुलीने सगळं काही सांगितलं..शारीरिक संबंध सहमतीने झाल्याचे तिने सांगितलं असलं तरी मुलगी अल्पवयीन असल्याने तिच्या प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे..आरोपी जळगाव जिल्ह्यातील जामनेरचा असून आरोपीचे नाव प्रशांत चव्हाण असे आहे.
 
  प्राप्त माहितीनुसार पीडित अल्पवयीन मुलगी आणि आरोपी प्रशांत चव्हाण चे प्रेमसंबध होते. या संबंधातून आरोपीने मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. दरम्यान नातेवाईकांच्या लग्नासाठी पिढीत मुलगी ही तिच्या छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील गावी गेली होती. तिथे तिला पोटात दुखू लागल्याने बुलढाणा येथील स्त्री रुग्णालयात उपचारासाठी आणले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर मुलगी ८ महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. डॉक्टरांनी बुलढाणा शहर पोलिसांनी याबद्दलची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी मुलीला विचारणा केली असता तिने घडला घटनाक्रम कथन केला. त्यावरून प्रशांत चव्हाण विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे..