दोन महिन्यांपूर्वी प्रेमविवाह... तरुणाने उचलले टोकाचे पाऊल!

मलकापूर तालुक्‍यातील घटना
 
suside
मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः २५ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज, १५ नोव्हेंबर रोजी सकाळी आठला मलकापूर शहरातील सालीपुरा भागात समोर आली.
मुकेश ऊर्फ पवन वानखेडे (रा. सालीपुरा, मलकापूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पवनने राहत्या घरातील एका खोलीत छताला दोरीच्या सहाय्याने गळफास  घेतला. कुटूंबियांना याबाबत कळताच त्याला तातडीने मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. पवनने दोन महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह केला होता. त्याने आत्महत्या का केली याबाबत नेमके कारण कळू शकले नाही. मलकापूर शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.