IPL सामन्यावर सट्टा, खामगावमध्ये दोघांना पकडले!

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आयपीएल सामन्यावर सट्टा खेळला जात असल्याच्या घटना खामगाव शहरात वारंवार समोर येत आहेत. सुटाळपुरा भागातही दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई 30 एप्रिलला संध्याकाळी करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक राहुल मुरलीधर जगदाळे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी श्याम सदाशिव राऊत 2 व अजय नंदकिशोर इंगळे (रा. सुटाळपुरा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः आयपीएल सामन्यावर सट्टा खेळला जात असल्याच्‍या घटना खामगाव शहरात वारंवार समोर येत आहेत. सुटाळपुरा भागातही दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्‍यात घेतले. ही कारवाई 30 एप्रिलला संध्याकाळी करण्यात आली.

सहायक पोलीस निरीक्षक राहुल मुरलीधर जगदाळे यांच्‍या तक्रारीवरून पोलिसांनी श्याम सदाशिव राऊत 2 व अजय नंदकिशोर इंगळे (रा. सुटाळपुरा) यांच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. गोपनीय माहितीच्‍या आधारे शिवाजीनगर पोलिसांनी श्याम राऊतच्‍या घरावर छापा मारला. तेव्‍हा दोघे पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स दरम्‍यान खेळल्या जात असलेल्या 20- 20 क्रिकेट सामन्यावर पैशाच्‍या हारजीतवर सट्टा खेळत होते. त्‍यांना पकडून 42 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला.