मोताळ्यात तरुणाला टोळक्‍याची घेरून मारहाण

लाखाचा ऐवज लुटून पळून गेले, मोताळा तालुक्‍यातील घटना
 
हाणामारी

मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पैशांच्या कारणावरून तरुणाला मोताळा फाट्याजवळील बोधेकर कॉम्प्लेक्समध्ये बोलावून घेत टोळक्‍याने बेदम मारहाण केली. त्‍याच्या गळ्यातील सोन्याची चैन, खिशातील ५० हजार रुपये असा एकूण १ लाख १० हजार रुपयांचा ऐवज लुटून टोळके पसार झाले. ही घटना काल, २३ नोव्‍हेंबरला सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.

शिवा मधुकर घडेकर (२७, रा. मोताळा वाॅर्ड क्रमांक ५) याने या प्रकरणात तक्रार दिली. त्‍याला मोताळा येथीलच हिमांशु झंवर याने भेटायला बोलावले होते. शिवा आल्यानंतर दोघांत वाद झाला. त्‍यानंतर एकाएकी मागून आलेल्या सात ते आठ तरुणांनी शिवाला पकडले. हिमांशूने रॉडने शिवाला मारहाण केली. देशी कट्ट्याने मारण्याची धमकी दिली. अनोळखी तरुणांनीही मारहाण करत शिविगाळ केली. त्‍यातील एकाने शिवाच्या गळ्यातील सोन्याची दीड तोळ्याची चैन (किंमत ६० हजार रुपये) व खिशातील ५० हजार रुपये काढून घेतले. मारहाण सुरू असताना ज्ञानेश्वर वाघ तिकडे धावल्याचे पाहून टोळके पळून गेले. पोलिसांनी हिमांशूसह त्‍याच्‍या साथीदारांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलीस निरिक्षक राहुल जंजाळ करत आहेत.