हातात तलवार घेऊन दहशत माजवत होता...

पोलिसांनी घडवली अद्दल!, खामगाव शहरातील घटना
 
 
शिवाजीनगर पोलीस ठाणे

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा घालत दहशत माजविणाऱ्या युवकाला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. काल, २२ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

प्रमोद भगवान धारपवार (३६, रा. भोईपुरा, दालफैल, खामगाव) असे आरोपीचे नाव आहे. दालफैल भागात एक व्यक्ती हातात तलवार घेऊन दहशत माजवत असल्याची माहिती पोलिसांना गोपनीय सूत्रांकडून मिळाली होती. पोलिसांनी दालफैल भागात धाव घेतली असता प्रमोद हातात तलवार घेऊन येणाऱ्या- जाणाऱ्यांना धमकावत असल्याचे दिसले. पोलीस आल्याचे कळताच त्‍याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी शिताफीने त्याच्या मुसक्या आवळून त्याला पोलीस ठाण्यात आणले. त्‍याच्याकडून लोखंडी तलवार जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.