शाळेची कागदपत्रे आणायला जातो म्‍हणाला... अल्पवयीन मुलगा गायब!; नांदुरा तालुक्यातील घटना

 
missing
नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शाळेची कागदपत्रे काढण्यासाठी नांदुऱ्याला जातो असे सांगून काकाच्या घरातून बाहेर पडलेला १७ वर्षीय मुलगा हरवला आहे. त्यांच्या आईने नांदुरा पोलीस ठाण्यात तो हरवल्याची तक्रार काल, २७ डिसेंबरला दिली आहे.
सौ. ललीता संजोग हिवराळे (रा. दिघी ता. नांदुरा) यांनी पतीसह येऊन या प्रकरणात तक्रार दिली. त्यांना तीन मुले असून, दोन नंबरचा मुलगा संघर्ष हरवला आहे. १७ डिसेंबरला तो पुणे येथून राहत्या गावी दिघीला लहान भावाच्या शाळेची कागदपत्रे काढण्यासाठी आला होता. २१ डिसेंबरला सकाळी ९ वाजता तो काका संघमित्र हिवराळे यांना सांगून नांदुरा येथून शाळेची कागदपत्रे आणण्यासाठी गेला. नंतर घरी परतलेला नाही. त्याच्याजवळील मोबाइलही लागत नाही. हरवल्याची नोंद घेऊन नांदुरा पोलीस तपास करत आहेत.