१३ वर्षांपासून गुंगारा... आज सापडलाच "हा' अट्टल गुन्हेगार!

 
File Photo

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः १३ वर्षांपासून घरफोडीच्या गुन्ह्यात फरारी असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज, १६ नोव्हेंबर रोजी जेरबंद केले. राजेश दशरथ जावळे (४२, मिलिंदनगर, बुलडाणा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

राजेशविरुद्ध बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल होता. मात्र तब्बल १३ वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी होत होता. आज तो बुलडाणा शहरात आला असल्याची गोपनीय माहिती एलसीबी पथकाला मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी सापळा रचून राजेशला अटक केली व बुलडाणा शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. ही कारवाई कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली व एलसीबीचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्या आदेशाने एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक अमित जाधव, पोहेकाँ रामविजय राजपूत, केदार फाळके, दीपक लेकुरवाळे यांनी केली.