Girl Rape : युवक अटकेत, २० पर्यंत पोलीस कोठडी!

 
rape
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः २१ वर्षीय गतिमंद तरुणीवर ३५ वर्षीय युवकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना १५ नोव्हेंबर रोजी दुपारी पहुरपूर्णा (ता. शेगाव) येथे समोर आली होती. काल, १६ नोव्हेंबर रोजी पीडित मुलीच्या आईने शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज, १७ नोव्हेंबर रोजी आरोपी गोपाळ मधुकर निंबाळकर(३५) याला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने २० नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
१५ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी असल्याने तरुणीची आई शेगाव येथे दर्शनासाठी गेली होती. गतिमंद तरुणी घरी एकटीच असल्याचे पाहून घरासमोर राहणारा गोपाळ मधुकर निंबाळकर घरात घुसला होता. त्याने गतिमंद तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. मुलीची आई घरी आल्यानंतर तिने ही बाब आईला सांगितली होती. त्यानंतर काल, १६ नोव्हेंबर रोजी पीडितेच्या आईने  पीडितेला घेऊन शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली होती.