"चिखली अर्बन'च्या ११ संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका
 
अचानक वळलेल्या बसवर कार धडकली, कारमधील चौघे जखमी; चिखली तालुक्‍यातील दुर्घटना
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ३१ ऑक्टोबर रोजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिखलीतील रानवारा रिसॉर्टमध्ये चिखली अर्बन बँकेतर्फे उद्योजकता प्रशिक्षण व प्रोत्साहन शिबिर घेण्यात आले. या कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. आमदार संजय कुटे, आमदार आकाश फुंडकर, आमदार सौ. श्वेताताई महाले हे लोकप्रतिनिधीही कार्यक्रमात सहभागी झाले होते. जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू असताना कार्यक्रम आयोजित केल्याने चिखली पोलिसांनी कार्यक्रमाच्या आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या शिबिराला जास्तीत जास्त संख्येने लोकांनी उपस्थित रहावे यासाठी आयोजकांनी प्रयत्न केले. स्वतः मास्क लावला नाही व उपस्थितांसाठी मास्क उपलब्ध केला नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी व कोविड प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन झाले, अशी तक्रार चिखली पोलीस ठाण्याचे नापोकाँ प्रकाश शिंदे यांनी दिली आहे. तक्रारीवरून आशुतोष गुप्त, बँकेचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम दिवटे, सरव्यवस्थापक संजय भंगिरे, संचालक मनोहर खडके, सुधाकर कुळकर्णी, राजेंद्र शेटे, विश्वनाथ जितकर, देविदास सुरुशे, डॉ. गणेश मांटे, सुशील शेटे, शैलेश बाहेती यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.