बुलडाणा पोलिसांना सापडला 'फॉर्मुला'!

 
file photo

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः औरंगाबाद, जालन्याच्या पोलीस शोधून थकले पण फाॅर्मुला हाती लागला तो बुलडाणा पोलिसांच्या हाती! या तीन जिल्ह्यांत "मोठी' कामगिरी करणारा हा घरफोड्या काल, २५ नोव्हेंबरला बुलडाणा पोलिसांच्या हाती लागला तोही जालना शहरात. जन्‍नूसिंग ऊर्फ फॉर्म्युला इंदलसिंग टाक (२८, रा. गुरुगोविंदसिंगनगर, जालना) याच्‍याविरुद्ध तब्‍बल १२ गुन्‍हे दाखल आहेत.

फॉर्म्युला नावाने ओळखला जाणारा हा तरुण अट्टल घरफोड्या आहे. जालना, औरंगाबाद आणि बुलडाणा शहरात त्याने अनेक घरे फोडली. तिन्ही जिल्ह्यांचे पोलीस त्याला शोधत होते. मात्र पोलिसांना गुंगारा देण्यास तो यशस्वी होत होता. तो जालना शहरात असल्याची गोपनीय माहिती बुलडाणा शहर पोलिसांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे  डी. बी. पथकाचे सहायक पोलीस निरिक्षक नीलेश लोधी यांच्या पथकाने जालना येथे जाऊन हा फॉर्म्युला ताब्यात घेतला. ही कारवाई कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद  चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली बुलडाणा शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रदीप साळुंखे यांच्या सुचनेनुसार डी.बी. पथकाचे सहायक पोलीस निरिक्षक नीलेश लोधी, एएसआय माधव पेटकर, श्री. पवार, पोहेकाँ महादेव इंगळे, पोहेकाँ लक्ष्मण कटक, पो.ना. अमोल खराडे, सुनील मोझे, पोकाँ सुभाष धनवे यांनी पार पाडली.