Buldana Live Sunday Special : ऑनलाइन वर्गामुळे पालकांची चिंता वाढली; मोबाइलमध्ये ‘काहीही’ दिसते; गैरप्रकारही वाढले!; सायबर पोलिसांनी दिलाय महत्त्वाचा सल्ला!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सध्या शाळा बंद असल्याने मुलांना ऑनलाइन क्लासेस करावे लागत आहेत. झूम ॲप, गुगल मीट अशा विविध माध्यमांचा वापर करून शाळांकडून क्लास भरवले जातात. मात्र अनेक विद्यार्थ्यांना या नवीन तंत्रज्ञानाची पुरेशी माहितीच नसल्याने नको त्या गोष्टी दिसणे, अनेकदा मुलींशी संवाद व जवळीक साधण्याचा प्रयत्न अशा गोष्टी वाढल्या आहेत. गेल्या काही दिवसांत …
 
Buldana Live Sunday Special : ऑनलाइन वर्गामुळे पालकांची चिंता वाढली; मोबाइलमध्ये ‘काहीही’ दिसते; गैरप्रकारही वाढले!; सायबर पोलिसांनी दिलाय महत्त्वाचा सल्ला!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सध्या शाळा बंद असल्याने मुलांना ऑनलाइन क्लासेस करावे लागत आहेत. झूम ॲप, गुगल मीट अशा विविध माध्यमांचा वापर करून शाळांकडून क्लास भरवले जातात. मात्र अनेक विद्यार्थ्यांना या नवीन तंत्रज्ञानाची पुरेशी माहितीच नसल्याने नको त्‍या गोष्टी दिसणे, अनेकदा मुलींशी संवाद व जवळीक साधण्याचा प्रयत्न अशा गोष्टी वाढल्या आहेत. गेल्या काही दिवसांत याबद्दलच्‍या तक्रारीही पोलीस ठाण्यांत दाखल झाल्या आहेत. याबद्दल बुलडाणा सायबर विभागाने बुलडाणा लाइव्हच्‍या माध्यमातून पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांना काही सूचना केल्या आहेत.

ऑनलाइन शिक्षणासाठी शिक्षक क्लासची लिंक तयार करतात. ती वर्गातील विद्यार्थ्यांना किंवा पालकांना पाठविली जाते. त्या लिंकवर क्‍लिक करून विद्यार्थी क्लासला जॉइन होतात. मात्र हीच लिंक विद्यार्थी, पालक किंवा शिक्षकांकडून अनावधानाने इतरांना सुद्धा फॉरवर्ड होते. त्यामुळे वर्गाबाहेरील व्यक्तीही वर्गात ऑनलाइन घुसल्याच्या घटना घडतात. खामगावात ९ व्या वर्गातील मुलीला ऑनलाइन क्लास दरम्यान अश्लील मेसेज पाठविण्यात आल्याची घटना घडली होती.

या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. दोन- तीन दिवसांपूर्वी आपल्या चिमुकलीला घेऊन ऑनलाइन क्‍लासला बसलेल्या शेगावमधील विवाहितेला अश्लील मेसेज करण्यात आल्याचाही प्रकार समोर आला होता. अशा घटना टाळण्यासाठी क्लासची लिंक अन्य कुठेही फॉरवर्ड न करण्याच्या सूचना शिक्षकांनी विद्यार्थ्यांना व पालकांना द्याव्यात. क्लास सुरू होण्याच्या काही वेळेपूर्वीच क्लासची लिंक विद्यार्थ्यांना पाठवावी. ऑनलाइन क्लाससाठी दुसऱ्या ॲप्लिकेशनचा वापर करण्याऐवजी स्वतःचे ॲप्लिकेशन तयार केले तर अशा घटनांना आळा बसू शकतो, असे बुलडाणा सायबर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक विलासकुमार सानप यांनी बुलडाणा लाइव्हशी बोलताना सांगितले.

पाल्यावर ठेवा लक्ष
पाल्याला ऑनलाइन क्‍लाससाठी स्‍मार्टफोन घेऊन दिलेला असला तरी, तो किंवा ती त्‍यावर काय सर्च करते, काय पाहते, कुणाशी संपर्कात असते यावर पालकांनी लक्ष ठेवणे अत्‍यंत गरजेचे असते. पालक कामाच्‍या गडबडीत किंवा पाल्यावर असलेल्या अतिविश्वासामुळे अशा तपासण्या किंवा लक्ष ठेवणे टाळतात आणि इथेच ते चूक करतात हे लक्ष ठेवणे गरजेचे आहे.