Buldana Live Exclusive : सहा महिन्यांत ४८० बेपत्ता झाले, अर्धेच पोलिसांना सापडले!; बाकीच्यांचे काय प्रश्न अनुत्तरीतच; महिला, तरुणींचे प्रचंड प्रमाण ठरतेय चिंतेचे!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा जिल्ह्यात बेपत्ता होण्याचे प्रमाण अचंबित करणारे आहे. कॉलेज तरुणी, तरुण एवढेच नव्हे तर विवाहित महिलाही बेपत्ता झाल्याच्या तक्रारी जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यांत दाखल आहेत. जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत ४८० जण बेपत्ता झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. १ जानेवारी ते ३० जून २०२१ पर्यंतची ही आकडेवारी आहे. अप्पर जिल्हा पोलीस …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा जिल्ह्यात बेपत्ता होण्याचे प्रमाण अचंबित करणारे आहे. कॉलेज तरुणी, तरुण एवढेच नव्हे तर विवाहित महिलाही बेपत्ता झाल्याच्या तक्रारी जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यांत दाखल आहेत. जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत ४८० जण बेपत्ता झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. १ जानेवारी ते ३० जून २०२१ पर्यंतची ही आकडेवारी आहे.

अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांनी याबद्दल सांगितले, की जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत मिसिंगची ४१२ प्रकरणे दाखल झाली. त्यात ४८० जण बेपत्ता झाले. बेपत्ता झालेल्यांत १७३ पुरुष तर ३०७ महिलांचा समावेश आहे. पैकी २४२ जण सापडले असल्याची माहिती अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली. १८ पेक्षा कमी वयोगटातील मुले किंवा मुली गायब झाल्यास अपहरणाचा गुन्हा दाखल होतो. पोलीस तातडीने त्यांचा शोध घेतात, असेही बजरंग बनसोडे यांनी सांगितले.

जुलैमध्ये आजवर ६१ बेपत्ता
चालू जुलै महिन्यांत व्‍यक्‍ती बेपत्ता होण्याचे सत्र कायम आहे. आज, २३ जुलैपर्यंत ६१ महिला, तरुणी, पुरुष हरवल्याची तक्रार ठिकठिकाणच्‍या पोलीस ठाण्यांत करण्यात आली आहे. यात तरुणी, महिलांचा आकडा तब्‍बल ४५ आहे. गेल्या २ दिवसांत चार तरुणी बेपत्ता झाल्या आहेत. यात खामगाव शहरातून २१ वर्षीय सोनाली खिरडकर, कव्हळा (ता. चिखली) येथील स्वाती भागवत मोरे (२३), खामगाव तालुक्‍यातील बोरजवळा येथील दुर्गा मंगेश धनोकार (१९), चांडोळ येथील संध्या सुभाष शिंबरे (२०) या तरुणींचा समावेश आहे.

भावाने तिला कॉलेजला सोडले; परत घ्यायला गेला तर…
भावाने तिला सकाळी ११ वाजता कॉलेजला सोडले. तिला घ्यायला संध्याकाळी ५ वाजता तो पुन्हा कॉलेजला गेला. तेव्हा त्याची बहीण त्याला तिथे दिसली नाही. ही घटना काल, २२ जुलै रोजी खामगाव शहरात घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात २१ तरुणी हरवल्याची तक्रार नोंदविण्यात आली. सोनाली अशोक खिरडकर (रा. शिवाजीनगर खामगाव) असे बेपत्ता तरुणीचे नाव आहे. काल सकाळी तिच्या भावाने तिला सुरजदेवी मोहता महाविद्यालयात सोडले. संध्याकाळी ५ वाजता तो बहिणीला घेण्यासाठी पुन्हा महाविद्यालयात गेला असता ती मिळून आली नाही. तिचा फोनही स्वीच ऑफ येत होता. तिचा नातेवाईक व इतरत्र शोध घेऊनही ती मिळून न आल्याने आज, २३ जुलैला शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.