Buldana Live Exclusive : कडक निर्बंधांतही जिल्ह्यातून 66 जण गायब!; 45 महिला-मुली घरातून निघून गेल्या….; दोन दिवसांत 5 मुली गायब!

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात सध्या कडक निर्बंध लागू आहेत. केवळ अत्यावश्यक कारणासाठी प्रवास आणि वाहतूक सुरू आहे. असे असतानाही जिल्ह्यातून महिनाभरात तब्बल 66 जण बेपत्ता झाले असून, यात निर्बंध लागू झाल्यानंतरचा आकडा 32 जणांचा आहे हे विशेष. महिनाभरात 45 महिला-मुली घरातून निघून गेल्याने याबाबत समाजाला आता गांभीर्याने विचार करण्याची गरज …
 

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात सध्या कडक निर्बंध लागू आहेत. केवळ अत्‍यावश्यक कारणासाठी प्रवास आणि वाहतूक सुरू आहे. असे असतानाही जिल्ह्यातून महिनाभरात तब्‍बल 66 जण बेपत्ता झाले असून, यात निर्बंध लागू झाल्यानंतरचा आकडा 32 जणांचा आहे हे विशेष. महिनाभरात 45 महिला-मुली घरातून निघून गेल्याने याबाबत समाजाला आता गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. गेल्या दोन दिवसांत 5 तरुणी बेपत्ता झाल्याचेही समोर आले आहे.

काल, 30 एप्रिलला 5 जण बेपत्ता झाले. त्‍यात 3 तरुणींचा समावेश होता. प्रेरणा देवानंद गवई (19, रा इंदिरानगर, बुलडाणा), साक्षी विजय चौधरी (19, रा. गोबजी खेत, जळगाव जामोद), सौ. माधुरी प्रेम पवार (22, रा. जामोद, ता. जळगाव जामोद), अरुण भागाजी साळवे (63, रा. आंबेडकरनगर, बुलडाणा), अशोक उर्फ अंकुश सुभाष वानखेडे (25, महाकालीनगर, मलकापूर) हे 5 जण काल बेपत्ता झाले असून, 29 एप्रिललाही दोन तरुणी बेपत्ता झाल्या आहेत. यात दिव्या रामप्रसाद बाहेकर (19, मेहकर टाऊन कृषी वैभव लॉन्समागे, मेहकर) व दिपाली रामदास बगळे (22, रा. धामणगाव बढे, ता. मोताळा) या दोघींचा समावेश आहे.

तरुणाईचा मोठा वाटा…
बेपत्ता होणाऱ्यांत तरुणाईचा मोठा वाटा असून, गेल्या एप्रिल महिन्यात 18 ते 25 वयोगटातील तब्‍बल 43 तरुण-तरुणी बेपत्ता झाल्या आहेत. यातही विशीच्‍या आतील मुली बेपत्ता होण्याचा आकडा पाहिला तर चिंताजनक परिस्‍थिती आहे. याबाबत आता समाजानेच चिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

साठी पार केलेल्यांनी सोडले घर…
महिनाभरात वयाची साठी पार केलेल्या 2 वृद्धांनी घर सोडल्याने कौटुंबिक कलहाची काळी बाजूही समोर आली आहे. अरुण भागाजी साळवे (63, रा. आंबेडकरनगर, बुलडाणा) आणि धोंडू रामू चव्‍हाण (60, रा. वाघजाळ शिवार, ता. मोताळा) अशी या वृद्धांची नावे आहेत.

बेपत्ता झालेल्यांचे पुढे होते काय?
महिनाभरात बेपत्ता झालेल्यांचा चिंतनीय आकडा असला तरी या बेपत्ता झालेल्यांचे पुढे होते काय, असा प्रश्न वाचकांना पडणे साहाजिक आहे. यातील अनेक जण पोलिस तपासातून घरी परत आणले जातात. मात्र तरुणाईचा विचार करता ते परत येण्याचा आकडा हा नगण्य असतो. 26 एप्रिलला बेपत्ता झालेल्या मंगला दिलीप वरखेडे या खामगावच्‍या 24 वर्षीय तरुणीचा मृतदेहच जनुना तलावात आढळला आला होता.