नवऱ्यापेक्षा दिर हँडसम! तोच सुंदर मुलगा देईन म्हणून महिला घरातून पळाली.....
Updated: Oct 4, 2024, 10:21 IST
हल्ली अनैतिक संबंधातून वेगवेगळे प्रकार समोर येत आहेत. पती पत्नीच्या संबंधाला अनैतिक संबंधाची किनार लागली की अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात. यातून अनेक भयंकर गुन्हेगारी घटना घटतात. अशीच एक घटना मध्य प्रदेशातील छतरपुर शहरातून समोर आला आहे. नवऱ्यापेक्षा दिर हँडसम असल्याने विवाहिता दिरासोबत पळून गेल्याची घटना घडली आहे.
प्राप्त माहितीनुसार सुंदर मुलगा व्हावा म्हणून पत्नीने पतीला धोका दिल्याची ही घटना आहे. पत्नी दिरासोबत पळून गेली असून याप्रकरणी बिचाऱ्या नवऱ्याने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
राजेंद्र कुछवाह असे या बिचाऱ्या पतीचे नाव आहे. पत्नी पळून गेल्यानंतर त्याने नातेवाइकांसह पोलीस ठाण्यात धाव घेतली. विवाहितेचा लग्न होऊन १३ वर्षे झाले आहेत, त्यांना अद्याप अपत्य प्राप्त झालेले नाहीत.
तीच म्हणणं होत की तिचा नवरा दिसायला सुंदर नाही. त्यामुळे सुंदर मुलगा होणार नाही असे तिला वाटायचे. त्यामुळे नवऱ्याला ती जवळ येऊ देत नव्हती. तिचा दिर सुंदर असल्याने दिरासोबत तिचे अफेयर सुरू झाले.
राजेंद्र कुछवाह यांच्या आईने पोलिसांना सांगितले की," माझ्या सुनेचे आणि छोट्या मुलाचे अनैतिक संबंध होते. त्यांना संबंध ठेवल्यापासून रोखले मात्र त्यांनी ऐकले नाही. आता दोघे पळून गेले आहेत. सूनेन फोन करून आत्महत्या करण्याची धमकी दिली..त्या दोघांना सोबत रहायची इच्छा आहे पण हे काम चुकीचं आहे असे विवाहितेच्या सासूने पोलिसांना सांगितल..