BREAKING अरे हे काय लावलं! जिल्ह्यात जिकड तिकड गांजाच गांजा; आता मलकापुर तालुक्यात पकडला पावणे दोन क्विंटल गांजा;तुरीच्या वावरात केली होती पेरणी..
Updated: Dec 23, 2023, 15:36 IST
मलकापूर: (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : मागील पंधरवड्यात गांज्या लागवडीच्या दोन घटना उघडकीस आल्या आहे. त्यातच आता तिसरी ताजी धक्कादायक बातमी समोर आली आहे. मलकापूर तालुक्यातील हिंगणकाझी शिवारात (१८ लाख ५७ हजार किमतीचा) तब्बल एक क्विंटल ८५ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. गहू ,कपाशी, तूर लावलेल्या शेतात गांजाची ७३ झाडे लपवण्यात आली होती. दरम्यान आरोपी सुभाष भागवत पाखरे (रा. भालेगाव) याला ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.
. जाहिरात 👆
मिळालेल्या माहितीनुसार, सदरची घटना २२डिसेंबरच्या संध्याकाळी रोजी उघडकीस आली. मलकापूर ग्रामीण पोलीसांना माहिती मिळताच पोलिसांनी तपास चक्रे फिरवले. काल सायंकाळपासून पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. आज २३ डिसेंबरच्या पहाटे तीन वाजे दरम्यान कारवाई चालली. आरोपीवर एनडीपीएस ॲक्टनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदरची कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी देवराम गवळी यांच्या मार्गदर्शनात मलकापूर ग्रामीणचे ठाणेदार संदिप काळे, उपनिरीक्षक प्रशांत राठोड, हेड कॉन्स्टेबल सचिन दासर, रघुनाथ जाधव, रविकांत बावस्कर, गणेश सुर्यवंशी, निता मोरे , संदिप राखोडे, सुभाष सरकटे यांनी केली.