मोटारसायकलला उडवले, दोघे गंभीर जखमी

मेहकर तालुक्‍यातील घटना
 
धावत्या दुचाकीवरून पडल्याने तरुण गंभीर, मोताळा तालुक्‍यातील अपघात
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना काल, १७ नोव्हेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास मेहकर -चिखली रस्त्यावरील हिवरा आश्रमजवळील शिवाजीनगर फाट्यावर घडली.
संतोष रंगनाथ शिंदे (३५) आणि अनिल प्रल्हाद गवई (३०, दोघे रा. सवडद, ता. सिंदखेड राजा) अशी अपघातात गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. दोघे मेहकरवरून सवडद येथे परतत होते. त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच साखरखेर्डा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी संतोष शिंदे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने औरंगाबाद येथे हलविण्यात आले तर अनिल गवई यांच्यावर चिखली येथे उपचार सुरू आहेत.