महिलेच्‍या दंडाला चावा, ब्‍लाऊज फाडले!

युवकाचे कृत्‍य, खामगावातील घटना
 
 
खामगाव शहर पोलीस ठाणे
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः महिलेच्या दंडाला चावा घेत चापटबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता ब्‍लाऊज फाडल्याची घटना खामगाव शहरातील अनुपम ट्रेडर्ससमोर काल, २४ नोव्हेंबरला रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. खामगाव शहर पोलिसांनी ३२ वर्षीय युवकाविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.
अनुपम ट्रेडर्ससमोर राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेच्या पतीला जितेंद्र बन्‍सीलाल पुरोहित (३२, रा. अनुपम ट्रेडर्ससमोर, खामगाव) याने चापट मारली. पतीला जितेंद्रच्या ताब्‍यातून सोडविण्यास धावलेल्या विवाहितेच्या दंडाला जितेंद्रने चावा घेतला. चापटबुक्‍क्‍यांनी तिला मारहाण केली. तिचे ब्‍लाऊज फाडले. त्‍यानंतरही तो शिविगाळ करतच होता. पोलिसांनी जितेंद्रविरुद्ध गुन्‍हा दाखल केला असून, तपास पो. ना. भानुदास तायडे करत आहेत.