अफवा, चुकीची माहिती पसरवणाऱ्यांनो खबरदार...

वाचा पोलीस काय म्‍हणालेत...
 
whats app
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः त्रिपुरा घटनेचे पडसाद अमरावती शहरात उमटले असून, जिल्ह्यात सामाजिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे.

सोशल मीडियावर अफवा, चुकीची माहिती पसरवणाऱ्यांना सुद्धा पोलिसांनी इशारा दिला आहे. चुकीची माहिती पसरवणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस प्रशासनाने कळविले आहे. सामाजिक तेढ निर्माण होईल अशी कोणतीही पोस्ट, माहिती, पोस्टर सोशल मीडियावर टाकू नये. लोकसमूह गट, समूहाने एकत्र येणे टाळावे. गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. गल्ली, मोहल्ला, नगर परिसरात सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी गर्दी करू नये.

कोणत्याही प्रकारच्या अफवा, चुकीची माहिती पसरवू नये व फॉरवर्ड करू नये. नागरिकांनी सुद्धा अफवा आणि अपप्रचार यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व संरक्षणासाठी पोलीस प्रशासनाला तात्काळ गैरप्रकाराची माहिती द्यावी. कुठेही अनुचित प्रकार होत असल्यास पोलीस प्रशासनाला तात्काळ माहिती देण्याचे आवाहन जिल्हा पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.