पत्‍नीच्या टोमण्यांनी वैतागला, शिक्षकाचे टोकाचे पाऊल!

शेगाव शहरातील घटना
 
फाशी
कमी पगार, लहार घर...म्‍हणून सासरचेही छळायचे; शेगाव शहरातील घटना
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ३२ वर्षीय शिक्षकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शेगावच्या फुलेनगरात २० नोव्हेंबर रोजी घडली होती. या प्रकरणी शिक्षकाच्या भावाच्या तक्रारीवरून शेगाव शहर पोलिसांनी पत्‍नी, सासू, सासऱ्याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. रामेश्वर सुभाष मसने (३२) असे आत्‍महत्‍या केलेल्या शिक्षकाचे नावे आहे. पगार कमी आहे, घर लहान अाहे या कारणावरून पत्‍नी, सासरचे लोक टोमणे मारत होते. त्‍याला छळाला कंटाळून मनसे यांनी टोकाचे पाऊल उचलल्याने तक्रारीत म्‍हटले आहे.
रामेश्वर यांच्या भावाने काल, २१ नोव्हेंबर रोजी तक्रार दिली आहे. मसने हे खामगाव येथील धर्म पब्लिक स्‍कूलमध्ये शिक्षक होते. मात्र पगार कमी असल्यामुळे व घर लहान असल्याच्या कारणावरून पत्नी शारदा टोमणे देत होती. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील सासरे बाळू महादेव घाटोळ व सासूसुद्धा सतत मानसिक त्रास देत होते. त्यामुळे पगारावरून व घर लहान असल्याच्या कारणावरून घरात सतत वाद होते. या त्रासाला कंटाळूनच रामेश्वरने आत्महत्या केल्याचे राजेश्वरने तक्रारीत म्हटले आहे.