विकृत नवरा! खून करण्याची नवी पद्धत; भरधाव चारचाकीने स्वतःच्या पत्नीला उडवले, जीवनातून उठवले! चिखलीतील घटना; घटनेच्या दिवशी कोर्टात होती तारीख...

 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विभक्त राहणाऱ्या पत्नीला कौटुंबिक वादातून यमसदनी धाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. समाधान सुरडकर असे या विकृत नवऱ्याचे नाव असून तो चिखली तालुक्यातील बेराळा येथील राहणारा आहे. सविता समाधान सुरडकर( रा. बेराळा, हमु आळंदी,पुणे) असे मृतक विवाहितेचे नाव आहे. या घटनेमुळे चिखली तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घटना ३० सप्टेंबरच्या सायंकाळची आहे. आरोपी समाधान सुरडकर आणि मृतक विवाहिता सविता सुरडकर दोघे सध्या वेगवेगळे राहत असून त्यांचे प्रकरण कोर्टात सुरू आहे. ३० सप्टेंबरला कोर्टात तारीख असल्याने सविता कोर्टातील काम आटोपून चिखली शहरात भाजीपाला खरेदी करत होती. त्यावेळी तिच्याशी संतोष इंगळे आणि त्याच्या पत्नीने वाद घातला. या प्रकरणाची तक्रार देण्यासाठी सविताने पोलीस स्टेशन गाठले, घडला प्रकार सविताने मावस भाऊ केशव भानुदास महाले यांना फोन करून करून सांगितला.त्यामुळे केशव महाले लगेच पोलीस स्टेशन मध्ये पोहचले, त्यांनी मध्यस्थी करून तक्रार द्यायची नाही असे ठरवले...👇
अन् घात झाला...
या प्रकारानंतर केशव महाले हे मावस बहीण सविता यांना मोटारसायकल वर बसवून घराकडे निघाले. यावेळी नवरा समाधान सुरडकर हा भरधाव वेगाने बलेनो कारने पाठीपागुन येत असल्याचे सविताने पाहिले. गाडी डाव्या बाजूने सुरक्षित घे असे सविताने मावस भाऊ केशव यांना सांगितले. गाडी डाव्या बाजूने सुरक्षित असताना देखील समाधान सुरडकर याने केशव महाले यांच्या दुचाकीला जीवाने मारण्याच्या उद्देशाने धडक दिली. या धडकेत सविता व केशव दोघे गंभीर झाले. या घटनेनंतर धडक मारणारा सविताचा नवरा बायको रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असताना तिथून फरार झाला..👇
   दरम्यान दोघा जखमींना चिखली येथील जवंजाळ हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आले. सविताची प्रकृती गंभीर असल्याने सविताला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले. मात्र काल,२ ऑक्टोबरला सविताची मृत्यूशी झुंज संपली. याप्रकरणी सविताचा मावस भाऊ केशव महाले यांचा जबाब पोलिसांनी नोंदवला असून त्यात आधी खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता, आता त्यात खुनाचे कलम समाविष्ट करण्यात आले आहे. पोलीस आरोपी समाधान सुरडकर याचा शोध घेत आहेत.