पोहण्यासाठी गेलेला तरुण धरणात बुडाला! अजून नाही सापडला..! जळगाव जामोद तालुक्यातील घटना

 
gfujty
जळगाव जामोद ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चार मित्रांसोबत पोहण्यासाठी धरणावर गेलेला तरुण पाण्यात बुडाला. काल, १ ऑगस्ट रोजी सायंकाळी ही घटना घडली. तरुणाचा शोध सुरू असून सकाळी ८ पर्यंत त्याचा शोध लागला नव्हता. जळगाव जामोद तालुक्यातील सोनबर्डी धरणावर ही घटना घडली.

प्राप्त माहितीनुसार जळगाव जामोद तालुक्यातील लाडणापूर येथील करण मंगल शामसकार (२०)  हा त्याच्या मित्रांसोबत धरणावर पोहायला गेला होता. त्याचे दोन मित्र धरणाच्या काठावर असताना दुसऱ्या मित्रांसोबत त्याने धरणात उडी घेतली. करणचा मित्र पाण्याच्या वर आला मात्र करण पाण्याबाहेर आलाच नाही.

तो बेपत्ता झाल्याने त्याचा शोध सुरू करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोध सुरू केला. रात्री अंधार पडल्याने शोधकार्य थांबविण्यात आले. सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले आहे.