SHOCKING! नवरा चारित्र्यावर संशय घ्यायचा! विवाहितेची दोन चिमुकल्यांसह तलावात आत्महत्या! धाडजवळील करडीची घटना!

 
fgjng
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) धाड नजीकच्या करडी येथील विवाहीतेने आपल्या दोन मुलांसह करडी संग्राहक तलावाच्या पाण्यात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज, २७ जुलैच्या दुपारी उघडकीस आली. यामुळे धाड परिसरासह मातृतीर्थ जिल्हा हादरला आहे.
 

धाड जवळच्या करडी (ता.बुलडाणा) येथील रहिवासी असलेल्या सौ. सरिता ज्ञानेश्वर पैठणे (३०) या विवाहित महिलेने आपल्या दोन मुलांसह कु. वेदता (११)  व चि. वंश(९) यांनी दिनांक २६ च्या रात्री साधारण तिन ते चार वाजताच्या सुमारास आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.   सदर महिलेचा मृतदेह आज ,२७ जुलैला दुपारी १२ वाजेच्या सुमारास करडी संग्राहक तलावाच्या पाण्यावर तरंगतांना आढळून आला. घटनेची माहिती  मिळताच धाड पोलिसांनी घटनास्थळी जावुन पंचनामा करीत प्रेत उत्तरीय तपासणी साठी धाड ग्रामीण रुग्णालयात रवाना केले.उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम , ठाणेदार अनिल पाटील यांनी घटनास्थळी पाहनी केली. 

दरम्यान मृतक  विवाहितेचा भाऊ  शरद कौतिकराव दामोदर (३५.रा. फर्दापुरर ता.सोयगाव जि. औरंगाबाद) यांनी धाड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. विवाहितेचा पती ज्ञानेश्वर विश्वनाथ पैठणे हा सातत्याने तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा.  सासु कासाबाई विश्वनाथ पैठणे,   नणंद शिला पगारे हे सुध्दा चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेला प्रचंड त्रास द्यायचे असे तक्रारीत म्हटले आहे. या त्रासाला कंटाळूनच सरिताने आत्महत्या केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तक्रारीवरून धाड पोलिसांनी मृतक विवाहितेच्या पतीसह सासू व नणंद विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.