कायद्याचा रक्षक असलेला पोलीस पाटीलच जेव्हा भक्षक बनतो! अंगणात झोपलेल्या महीलेजवळ जाऊन केले पाप! गावातल्या महिलांनी धो धो धुतले..! संग्रामपूर तालुक्यातील धक्कादायक घटना

 
dggrd
संग्रामपूर( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अंगणात झोपलेल्या महिलेजवळ जाऊन गावच्या पोलीस पाटलाने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथे ४ मे च्या मध्यरात्री हा प्रकार घडला. याप्रकरणी पीडित महिलेने तामगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलीस पाटलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार पीडित महिलेचे गावात घरकुल बांधकाम सुरू आहे. त्यामुळे महिला व तिचे कुटुंब अंगणात झोपले होती. पोलीस पाटील गणेश सुरडकर याने महिलेच्या जवळ जाऊन जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिलेने आरडाओरड केली त्यामुळे आजूबाजूच्या महील्या धावत आल्यागावातील महिलांनी यावेळी पोलीस पाटलाला चांगलाच चोप दिला.

दुसऱ्या दिवशी महिलेने तामगाव पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी   संशयित गणेश पाटील विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. कायद्याचा रक्षक असलेला पोलीस पाटीलच भक्षक बनल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पुढील तपास तामगाव पोलीस करीत आहेत.