शाळकरी मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न ! उचलून गाडीत टाकत होते मात्र तिने हाताला चावा घेत करून घेतली सुटका! चिमुकलीच्या तोंडूनच ऐका तिच्यासोबत काय घडलं! संग्रामपुरातील धक्कादायक घटना!

 
kraim
संग्रामपूर( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): १० वर्षीय शाळकरी मुलीचे अपहरण करण्याच्या प्रयत्न झाल्याची घटना संग्रामपूरात समोर आली आहे. मात्र बहादुर चिमुकलीने अपहरण करणाऱ्या महिलेच्या हाताला कडकडुन चावा घेत हा प्रयत्न हाणून पाडला. याप्रकरणी तामगाव पोलीस ठाण्यात अनोळखी महिलेसह दोघा अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 शनिवारी संग्रापुरातील भरवस्तीत आसरा माता मंदिरासमोर एका गाडीत दोन पुरुष व एक महिला बसलेली होती. महिला गाडीच्या खाली उतरली व तिने शाळेत जात असलेल्या एका विद्यार्थिनीचा हात घट्ट पकडुन चार चाकी गाडीत कोंबण्याचा प्रयत्न केला.  आमच्या सोबत आली नाही तर जीवाने मारू अशी धमकी दिली मात्र हिम्मत दाखवुन चिमुकलीने महिलेच्या हाताला चावा घेऊन तीची सुटका करून घेतली. या प्रकारामुळे संग्रामपूरात एकच खळबळ उडाली असून शाळकरी मुलींचे अपहरण करणारी टोळी सक्रिय असल्याचे बोलल्या जात आहे. तामगाव पोलीस  याप्रकरणी एका अनोळखी  महिलेसह दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.