२५ वर्षीय विवाहितेने सौर ऊर्जेच्या खांबाला घेतला गळफास! देऊळगावराजा तालुक्यातील घटना

 
rtuy
अंढेरा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)- २५ वर्षीय विवाहितेने शेतातील सौर ऊर्जेच्या खांबाला गळफास घेऊन आत्महत्या केली . काल, ४ मे च्या रात्री साडेआठ वाजता ही घटना देऊळगावराजा तालुक्यातील पिंप्री आंधळे येथे उघडकीस आली. आश्र्विनी गणेश आंधळे (२५, रा. पिंप्री आंधळे, ता. देऊळगावराजा) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार आश्विनी ने शेतातील सौर ऊर्जेच्या खांबाला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. रात्री उशिरा ही घटना उघडकीस आल्यानंतर अंढेरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. आज, ५ मे रोजी सकाळी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. मृतक आश्र्वीनीच्या पश्यात पती, १ मुलगा व १ मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी अंढेरा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज वासाडे करीत आहेत.