21 एप्रिलपासून बेपत्ता 24 वर्षीय तरुणीचा जनुना तलावात आज थेट मृतदेहच आढळला!; खामगावमध्ये खळबळ

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव शहरातील जनुना तलावात आज, 26 एप्रिलला दुपारी 2 च्या सुमारास 24 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. ती 21 एप्रिलपासून घाटपुरी नाका येथील राहत्या घरातून बेपत्ता होती. आज तिचा थेट मृतदेहच आढळला. मंगला दिलीप वरखेडे असे मृतक तरुणीचे नाव आहे. शिवाजीनगर पोलिसांना दुपारी तलावात तरुणीचा मृतदेह आढळल्याची माहिती …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)  ः खामगाव शहरातील जनुना तलावात आज, 26 एप्रिलला दुपारी 2 च्‍या सुमारास 24 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळल्‍याने एकच खळबळ उडाली. ती 21 एप्रिलपासून घाटपुरी नाका येथील राहत्‍या घरातून बेपत्ता होती. आज तिचा थेट मृतदेहच आढळला.

मंगला दिलीप वरखेडे असे मृतक तरुणीचे नाव आहे. शिवाजीनगर पोलिसांना दुपारी तलावात तरुणीचा मृतदेह आढळल्‍याची माहिती मिळताच सहायक पोलीस निरिक्षक श्री. जगदाळे, पोहेकाँ श्री. खांडे व पोकाँ सिद्धार्थ गवारगुरु घटनास्‍थळी पोहोचले. नागरिकांच्‍या मदतीने त्‍यांनी मृतदेह बाहेर काढला. पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. कथ्या रंगाचा टॉप व काळी लॅगी घातलेली, पायात चैन पट्ट्या व हातात अंगठी असलेली ही तरुणी कोण असा सुरुवातीला प्रश्न सर्वांनाच पडला होता. पण तपासात ती घाटपुरी नाका येथील मंगला वरखेडे असल्याचे समोर आले. तिने आत्‍महत्‍या केली की अपघात हे रात्री उशिरापर्यंत समोर येऊ शकले नाही. शिवाजी नगर पोलीस तपास करत आहेत.