१९ वर्षीय तरुणी घरातून निघून गेली!

शेगाव तालुक्‍यातील घटना, दिवसभरात ३ तरुणी गायब
 
missing
जलंब (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खोलखेड (ता. शेगाव) येथील १९ वर्षीय तरुणी घरातून निघून गेल्याची तक्रार तिच्या आईने जलंब पोलीस ठाण्यात केली आहे. पोलिसांनी हरवल्याची नोंद घेऊन शोध सुरू केला आहे.

सौ. सविता मधुकर रणसिंगे (रा. खोलखेड) यांनी या प्रकरणात तक्रार दिली. रेणुका मधुकर रणसिंगे (१९) ही २५ नोव्‍हेंबरच्या पहाटे तीनच्या सुमारास घरातून निघून गेली. नातेवाइकांकडे, मैत्रिणींकडे तिचा शोध घेण्यात आला. मात्र ती मिळून आली नाही. अखेर सकाळी दहाला पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. तपास पोहेकाँ तुकाराम इंगळे करत आहेत. रंग गोरा, उंची ५ फूट, अंगात गुलाबी पंजाबी ड्रेस, उजव्या हाताला रेणुका गोंधलेले असे तिचे वर्णन आहे.

मेहकर, जळगाव जामोदमधूनही तरुणी बेपत्ता
मेहकर शहरातील मिलिंदनगरातून २८ वर्षीय सौ. सुनिता अमोल शर्मा ही विवाहित तरुणी बेपत्ता झाली असून, ती हरवल्याची तक्रार आज मेहकर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याशिवाय जामोद (ता. जळगाव जामोद) येथील १८ वर्षीय दुर्गा अनिल राऊत ही तरुणी घरातून गायब झाल्याची तक्रार जळगाव जामोद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.